अड. राजेश उगमसिंह राजपुरोहित यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वकील पॅनेलवर नियुक्ती

  • Share on :

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅड. राजेश राजपुरोहित यांची महानगरपालिकेच्या वकील पॅनेलवर नियुक्ती केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रमुख विधी सल्लागार मा. अॅड. राजेश आगळे सर यांच्या स्वाक्षरीने अॅड. राजेश राजपुरोहित यांना नियुक्तीबाबतचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले आहे.

अॅड. राजेश राजपुरोहित यांनी आपल्या वकिली व्यवसायात विविध स्वरूपाची तसेच अनेक महत्त्वपूर्ण व हाय-प्रोफाईल प्रकरणे हाताळली असून, त्यांच्या कायदेविषयक अनुभवाची आणि न्यायालयीन कामकाजातील कौशल्याची दखल घेतली जाते. विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये प्रभावीपणे बाजू मांडत त्यांनी विधी क्षेत्रात आपली स्वतंत्र व विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे.

राजकीय व सामाजिक क्षेत्रातही अॅड. राजेश राजपुरोहित यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा (लीगल सेल), पिंपरी-चिंचवड शहरचे मा. शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली असून, या माध्यमातून कायदेविषयक क्षेत्रात सक्रिय योगदान दिले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वकील पॅनेलवरील ही नियुक्ती अॅड. राजेश राजपुरोहित यांच्या कायदेविषयक कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. नियुक्तीच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या विविध कायदेशीर व न्यायालयीन प्रकरणांमध्ये महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल विधी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सहकारी, मित्रपरिवार व हितचिंतकांकडून अॅड. राजेश राजपुरोहित यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अॅड. राजेश राजपुरोहित यांचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वकील पॅनेलवर नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! ????????



Latest News

Everyday news at your fingertips Try Ranjeet Times E-Paper